बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रितेश देशमुखनं मुलासाठी गायली अंगाई, पाहा बाप-लेकाचा क्युट व्हिडीओ

मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुखनं त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. आज रितेशचे जगभरात चाहते आहेत. बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा मुलगा राहिल याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं सोशल मिडियाद्वारे बाप-लेकाचा एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

अनेक वेळा आपण आईला तिच्या मुलाला निजवण्यासाठी अंगाई गाताना पाहतो. तर आईच्या गोड गळ्यातील ती अंगाई ऐकून तिच बाळही निजतं. पण इथं अभिनेता रितेश देशमुख त्याच्या आवाजात मुलाला झोपी लावत आहे. सध्या या बापलेकांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश आणि राहिलमधील घट्ट नाते पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये राहिल रितेशच्या छातीला बिलगून झोपला आहे आणि दोघेही ‘जाने तू या जाने ना’ हे गाणे गुणगुणत आहे.

दरम्यान, रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख हे नेहमीच कपल गोल्स देताना दिसतात. या दोघांची जोडी चाहत्यांची आवडीची जोडी आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये ही जोडी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. रितेश-जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच एकमेकांचे मजेशीर, रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करताना दिसतात.

पाहा व्हिडीओ – 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

दारूसाठी काय पण! जिवाचा आटापिटा करत वाचवली दारू, व्हिडीओ व्हायरल

पुण्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, वाचा आजची आकडेवारी

बारावीच्या परिक्षा रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल करून घेणार नाही; ‘या’ शहरातील खासगी रुग्णालयांचा अजब निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More