“त्या राक्षसाला शिवकाळातील चौरंगाची शिक्षा..”; बदलापूर प्रकरणी रितेश देशमुखची मागणी

Riteish Deshmukh | देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त केला जातोय. कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्काराची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्रात संतापजनक घटना घडली आहे. बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आला आहे. शाळेतील सफाई कामगाराने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. संतप्त नागरिकांनी बदलापूर येथे आंदोलन करत तोडफोड केली. (Riteish Deshmukh)

रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत

आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी तब्बल 10 तास कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. बदलापुरात या घटनेमुळे नागरिकांचं रौद्ररुप पहायला मिळालं. आता याच प्रकरणी बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुखने देखील संताप व्यक्त केलाय. त्याने थेट मोठी मागणी केली आहे.

रितेश देशमुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. “एक पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय, वैतागलोय आणि चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वत:च्या घराइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली, चौरंग- हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे.”, असं ट्वीट रितेशने (Riteish Deshmukh) केलं आहे.

बदलापूरमध्ये आता स्थिती काय?

दरम्यान, या प्रकरणी आता विरोधी गटही आक्रमक झाला आहे. या घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे. “हे सरकार भगिनींना पैसे तर देत आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय? ती कधी देणार? तुमच्या राज्यातील तीन-चार वर्षांच्या चिमुरडय़ाही सुरक्षित नसतील, नराधमांच्या विकृतीच्या बळी ठरत असतील तर ‘भावा’च्या नात्याचे ढोल पिटण्याचा अधिकार तुम्हाला नाही.”, अशी संतप्त टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. (Riteish Deshmukh)

या घटनेनंतर बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण वातावरण आहे. बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे. तसेच शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

News Title –  Riteish Deshmukh Statement On Badlapur Rape

महत्त्वाच्या बातम्या-

संतापजनक! बदलापूरनंतर अकोल्यात 6 मुलींचा लैंगिक छळ, वर्गशिक्षकानेच केलं असं काही की..

आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प?, जाणून घ्या सविस्तर

आज ‘या’ 3 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल!

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

बदलापूर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द?, बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर; मंत्री अदिती तटकरे आक्रमक