मनोरंजन

रितेश आणि जेनेलिया देशमुखनं घेतला अवयवदानाचा निर्णय

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख यांनी ‘डॉक्टर्स दिना’च्या निमित्ताने एक स्तुत्य निर्णय जाहीर केला. रितेश-जेनेलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रितेश-जेनेलिया यांनी अवयवदानाची माहिती दिली. या सेलिब्रिटी कपलने जनजागृती करणारा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांकडून दोघांचं कौतुक केलं जात आहे.

रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. पण ते शक्य झालं नव्हतं. डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही अवयवदान करण्याची शपथ घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI यांचे आभार, असं जेनेलियाने म्हटलंय.

तुम्हाला एखाद्यास सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असेल, तर ‘आयुष्य’ हेच ते गिफ्ट आहे. या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या, असं आवाहन रितेश-जेनेलिया यांनी इंस्टाग्रामवरुन केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

“सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”

मुंबईकरांनो…सलूनमध्ये चाललाय?, तर आधी ‘ही’ नियमावली जरूर वाचा…

कोरोनाचा धुमाकूळ कायम असताना ‘या’ राज्यानं घेतला शाळा सुरू करण्याचा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या