बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रितेश-जेनेलियाचा ‘तो’ मजेशिर व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुखनं त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. आज रितेशचे जगभरात चाहते आहेत. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळत असतो. तो नेहमी वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतो. आता रितेशचा आणि जेनेलियाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जेनेलिया असल्याचं दिसत आहे. तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘पुट यॉर हॅन्ड्स ऑन माय शोल्डर’ हे गाणं सुरु आहे. जेनेलिया उठल्यानंतर रितेशच्या लक्षात येतं की जेनेलिया तर इथे नाही मग हा हात कोणाचा तर तो हात दिग्दर्शक मिलाप झवेरीचा असतो. मिलाप त्या दोघांच्या मागे लपलेला होता. त्यांचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने शेअर केल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 18 हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, बॉलीवूडमध्ये काही लग्न झालेल्या जोड्याही चर्चेत असतात. त्यापैकीच एक जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा. या दोघांच्या लग्नाला 9 वर्षे झाली असून दोघेही खूप आनंदी आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

नरेंद्र मोदी देशातील आणि भाजपचे सर्वात मोठे नेते- संजय राऊत

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास मेंदुवरही होऊ शकतो परिणाम!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून स्थानिक नागरिक आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! एका झाडावर घेतलं 22 जातींच्या आंब्यांचं उत्पादन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More