बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा या दोघांनी त्यांच्या अभिनयाची छाप बाॅलिवूड इंडस्ट्रीसोबतच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील उमटवली आहे. या दोघांची जोडी सर्वात जास्त लोकप्रिय असून यांचे सोबतचे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडीयावर धुमाकुळ घालतात. अशातच त्यांचा होळीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडीओ आता चालू असलेल्या ट्रेंडिंग गाण्यावर करण्यात आला आहे. इंस्टावर या गाण्यावर आय ब्लिंक स्टेप्स केल्या जातात. मात्र रितेश आणि जेनेलियाने यावर होळीचा व्हिडीओ केला आहे. रितेशने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूकवरुन शेअर केला आहे.

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूकवर शेअर करताच लोकांचा त्याला भरभरुन प्रतिसाद येऊ लागला. एवढचं नाही तर या व्हिडीओला 1 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तसेच हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात फाॅरवर्ड केला जात आहे.

दरम्यान, या आधी ‘माऊली’ चित्रपटात एका होळीच्या गाण्यात रितेश आणि जेनेलिया सोबत दिसले होते. या चित्रपटामध्ये जेनेलिया काम करत नव्हती. मात्र, ती या गाण्यामध्ये दिसून येते. तसेच त्या दोघांचं ते गाणं लोकांच्या प्रचंड पसंतीस आलं.

थोडक्यात बातम्या-

“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही”

आमचं ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल – चंद्रकांत पाटील

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत

“शरद पवार-अमित शहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही”

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More