मनोरंजन

रितेश देशमुख शिवरायांवरील भव्यदिव्य बायोपिकची निर्मिती करतोय; या अभिनेत्याचा मोठा खुलासा

Photo- YouTube

मुंबई | नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता अजय देवगणला छत्रपती शिवाजी महाराजांचा बायोपिक आला तर त्यात महाराजांची भूमिका कोणी साकारावी असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजयने अभिनेता रितेश देशमुखचं नाव घेतलं आहे.

रितेश गेल्या काही दिवसांपासूनच शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर काम करत असल्याचा खुलासा अजय देवगनने केला आहे. मात्र रितेशने चित्रपटासंबंधी आणखी माहिती देणं टाळलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, जेव्हा पासून तान्हाजी चित्रपटाची घोषणा झाली आहे. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या- 

रितेश-जेनेलियीचा ज्वारीच्या शेतातील टिकटाॅक व्हीडिओ व्हायरल

जेनेलिया-रितेशची प्रेमाची ‘गाठ’; जेनेलियाने शेअर केला खास व्हिडिओ

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या