Ritesh Deshmukh | महाराष्ट्राची मराठमोळी आणि सर्वात लोकप्रिय जोडी रितेश आणि जिनिलिया देशमुख यांची आहे. रितेश आणि जिनिलियाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यांना दादा वहिनी या नावाने बोलवलं जातं. रितेश आणि जिनिलिया दोघेजण सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या फॉलोवर्ससाठी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान सध्या चर्चा आहे ती जिनिलियाने केलेल्या खुलाशाची.
जिनिलियाने केला मोठा खुलासा
रितेश (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया या दोघांच्या नात्यामधलं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. अनेकवेळा मुलाखतीमध्ये या दोघांनी त्यांच्या प्रेमकाहानीबद्दल सांगितलं. दोघांच्या नात्यामध्ये कशा प्रकारचे चढउतार आले हे देखील त्यांनी सांगितलं होतं. मात्र एका मुलाखतीमध्ये जिनिलियाने रितेशबद्दल एक गोष्ट सांगितली जी ऐकून सगळ्यांना धक्का बसला.
मेसेज मी गांभीर्याने घेतला-
कपिल शर्मा या रिएॅलीटी शोमध्ये बोलत असताना जिनिलिया म्हणाली, एका दिवशी मला रितेशने (Ritesh Deshmukh) ब्रेकअपचा मेसेज पाठवला होता. जिनिलियाला डेट करत असताना रितेशने एकेदिवशी तिला ब्रेकअपचा मेसेज केला होता. हा मेसेज पाहून जिनिलियाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. रितेशने जिनिलियाला केलेल्या मेसेज हा एक प्रँक होता.
View this post on Instagram
तेव्हा नाराज झाले होते-
रितेशने तो मेसेज पाठवला तेव्हा मला धक्का बसला होताा. शिवाय त्याचा मेसेज बघून मी नाराज सुद्धा झाले होते. त्यावेळी दोघांचं नातं खरंच ब्रेकअपवर आलं होतं. शेवटी कसंबसं रितेशने हा आपला प्रँक असल्याचं जिनिलियाला समजावलं. त्यानंतर दोघांमध्ये कधीही वेगळं होण्याचा विषय निघाला नाही. त्या घटनेनंतर रितेशने पुन्हा कधीच तिच्यासोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला नाही.
News Title : Ritesh Deshmukh makes prank with genelia
महत्त्वाच्या बातम्या-
अनन्या पांडेने हिप सर्जरी केली?; ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
हवेलीत पार पडली ‘अजित मॅरेथॅान’, प्रतिक्षा बाजारे यांच्याकडून आयोजन
मनोज जरांगे पाटील 7 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; असा असणार दौरा
बजाजची ‘ही’ बाईक एकदा चार्ज केल्यावर धावणार तब्बल 136 किमी; जाणून घ्या किंमत