रितेश-जिनेलियाला मोठा धक्का; चौकशी होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

लातूर | गेल्या अनेक दिवसांपासून लातूर एमआयडीसीतील भूखंड प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनेलिया देशमुख(Genelia Deshmukh) यांच्यावर लातूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

लातूर एमआयडीसीतील भूखंडासाठी 16 उद्योजक प्रतिक्षेत होते. मग या उद्योजकांना डावलून रितेश-जिनेलियाची पन्नास-पन्नास टक्के भागीदारी असणाऱ्या कंपनीला केवळ 22 दिवसांत भूखंड कसा मंजूर केला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कोणत्या निकषाच्या आधारे देशमुखांच्या कंपनीला 116 कोटींचा कर्जपुरवठा केला ?, तसेच त्यात एवढी तत्परता कशी दाखवली गेली, असा प्रश्नही लातूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अ‌ॅड. प्रदीप मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

आता या मागणीची दखल सहकार मंत्र्यांनी घेतली आहे. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळं रितेश- जिनेलियाला मोठा धक्का बसला आहे.

देशमुखांच्या कंपनीने, 5 ऑक्टोबर 2021 रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडं कर्जाची मागणी केली होती. यानंतर या बॅंकेने 27 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीला 61 कोटी रूपयांचे कर्ज देऊ केले. यानंतर पुन्हा बॅंकेने देशमुखांच्या कंपनीला 25 जुलै 2022 रोजी 55 कोटी रूपयांचे कर्ज दिले.

परंतु आता या प्रकरणाची तपासणी होणार असल्यानं, देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर आता रितेश-जिनेलिया काय उत्तर देतील, याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-