मुंबई | 2022 वर्षाच्या अखेरीस रिलीज झालेल्या रितेश देशमुख(Ritesh Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलियाच्या(Genelia) ‘वेड'(Ved Marathi Movei) चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. वेड चित्रपटाची क्रेझ महाराष्ट्रभर दिसून येत आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशनं दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. तर जेनेलियाचाही हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसत आहे. परंतु हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
या चित्रपटात मराठी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांचीही भूमिका आहे. तर सलमान खाननंही(Salman Khan) ‘वेड लावलंय’ या गाण्यात हेजरी लावून गाण्याला चार चाॅंद लावले आहेत. सध्या या चित्रपटाची आणि चित्रपटातील गाण्यांची सगळीकडं चर्चा होताना दिसत आहे.
वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत, टीव्ही कार्यक्रमांना हजेरी लावत, रील्स करत रितेश-जिनेलियानं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. या चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर या चित्रपटानं एका आठवड्यात तब्बल 20 कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, ‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून काही थेटर मालकांनी दोन हिंदी चित्रपटांचे शो थांबवले असल्याची माहिती मिळाली आहे. यावरूनच वेड चित्रपटानं प्रेक्षकांना किती वेड लावलं आहे, हे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
- सर्वात मोठी बातमी; संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?
- ‘…तर पूर्ण नागडा करीन’; संजय राऊतांचा राणेंना इशारा
- संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं घ्यायचा विचार करताय! मग जाणून घ्या ताजे दर
- उर्फीच्या कपड्यावरून वाद आणखीच पेटला, अक्षरश: चित्रा वाघ-रूपाली चाकणकर एकमेकींना भिडल्या
- मन सुन्न करणारी घटना; आजोबा-नातवाचा दुर्देवी अंत