Top News

मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी

मंबुई | शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखवर टीकेची झोड उठलीय. त्यामुळे त्याने याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. 

आम्ही भक्ती भावनेतून मेघडंबरीत चढून फोटो काढले होते. आमचा कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. यामुळे कोणी दुखावले असेल तर त्यांची आम्ही अंतःकरणापासून माफी मागतो, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 5 जुलैला रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत रायगडावर गेले होते. तेव्हा मेघडंबरीत चढून त्यांनी फोटो काढले होते. 

महत्त्वाच्या बातम्या –

-रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन; रितेश देशमुखवर टीकेची झोड

-काल आक्रमक असलेेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर!

-नागपूर अधिवेशनावर पाणी; काय म्हणाले अजित पवार?

-नागपुरात तुफान पाऊस, विधीमंडळातील वीज गायब असल्याने कामकाज स्थगित

-शशी थरुर यांना आता त्यांच्या परदेशातील गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या