बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

नवी दिल्ली | कुस्तीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिकाने आत्महत्या केलीय. रितिका ही बबिता फोगाट, गीता फोगाटची मामेबहीण होती.

सोमवारी बलाली गावात तिने गळफास लावून आत्महत्या केली. रितिकाने 12 ते 14 मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये रितिका एका सामन्यात पराभूत झाली. या पराभवानंतर तिला हादरा बसला आणि त्यानंतर 15 मार्च रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास बलाली गावच्या घरात पंख्याला स्कार्फ लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे.

भरतपूर या ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत रितिकाचा अवघ्या एका गुणाने पराभव झाला होता. याचा तिला चांगलाचं धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आलं नाही. त्यामुळे नैराश्य आल्याने तिने स्वतःला संपवलं आहे.

दरम्यान, 17 वर्षीय रितिकालाही गीता आणि बबिताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व्हायचे होते. यासाठी तिने रात्रंदिवस कष्ट केले. ती पैलवान महावीर फोगाट या अकादमीमध्ये 5 वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती.

थोडक्यात बातम्या- 

अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप

शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More