एकच नंबर भावा; ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स

मुंबई | विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या एका खेळाडूनं तब्बल 7 सिक्सर्स ठोकण्याचा पराक्रम गाजवला आणि रेकॉर्ड मोडीत काढलंय. बॉलरनं टाकलेल्या एका नो बॉलचा त्यानं फायदा उठवत 7 बॉलमध्ये 7 सिक्स फटकावून एक नवा इतिहास रचला. तो खेळाडू आहे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) या सामन्यात तब्बल द्विशतकी खेळी केली. पण 49 व्या ओवरमध्ये त्यानं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला.

यंदाच्या विजय हजारे करंडकातला ऋतुराजचा (Ruturaj Gaikwad) हा तिसराच सामना होता. या तीन मॅचमध्ये त्यानं दोन शतकांसह तब्बल 384 धावा फटकावल्या आहेत.

पहिल्याच मॅचमध्ये त्यानं रेल्वेविरुद्ध 124 धावांची नाबाद खेळी केली होती. तर आज उत्तर प्रदेशविरुद्ध क्वार्टर फायनल सामन्यात 220 धावा फटकावल्या.

ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राच्या इनिंगमध्ये 49 व्या षटकात 7 षटकार मारले. एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज आहे. यूपीचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या गोलंदाजीवर ऋतुराजने ही कामगिरी केली.

महत्त्वाच्या बातम्या-