मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन

Rituraj Singh |  टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचं निधन झालं आहे. यामुळे टीव्ही आणि चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. कार्डीअॅक अरेस्टमुळे त्याचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘या’ टीव्ही आणि सिनेमांमध्ये केलं काम

अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट, अदालत, दिया ओर बाती सारख्या कार्याक्रमांमधून त्यांनी आपल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहे. रूपाली गांगुलीसह हिंदी लोकप्रिय मालिका अनुपमामध्ये झळकले होते. याशिवाय त्यांनी बद्रीनाथ की दुल्हनिया, सत्यमेव जयते २ इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Rituraj Singh)

जानेवारी महिन्यामध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये त्यांनी रफीकची भूमिका केली होती. अभिनेते अमित बहल यांनी ऋतुराज (Rituraj Singh) यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. यावेळी त्यांना कार्डीअॅक अरेस्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. काही काळापासून त्यांना स्वादुपिंडाचा त्रास झाला होता. त्यांच्या जाण्यान कुटुंबालाच नाहीतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अमित बहलकडून निधनाच्या वृत्ताला दुजोरा

ऋतुराज यांचे मित्र आणि अभिनेते अमित बहल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “स्वादुपिंडाच्या आजाराच्या उपचारासाठी त्यांना काही काळापूर्वी रूग्णालय दखल करण्यात आले होते. घरी परतत असताना कार्डिअॅक्ट अरेस्टमुळे त्यांचे निधन झालं आहे”, असं अमित बहल म्हणाले आहे.

काही दिवसांआधी हिंदी अभिनेत्री कविता चौधरी यांंचं कर्करोगामुळे निधन झालं. त्यांना हर्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्यांचे देखील निधन झाले. यानंतर पुन्हा मनोरंजनसृष्टीतून ऋतुराज यांचं निधन झाल्याची वार्ता आली.

चाहत्यांनी ऋतुराज यांच्या जाण्यानं शोक व्यक्त केला आहे. तर संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर आदरांजली वाहताना चाहते दिसत आहेत.

News Title – Rituraj Singh Passed Away

महत्त्वाच्या बातम्या

सर्वांत मोठी बातमी ! मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार

विशेष अधिवेशनापुर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा!

एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं

बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!

परीक्षेत चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड; तपासात झाला धक्कादायक खुलासा