बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर ‘फ्री-ब्रिटनी’ हॅशटॅग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी प्रसिद्ध अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनीची पोस्ट केली आहे तर काहींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा हॅशटॅग लावून ब्रिटनीसाठी पाऊल उचललं आहे. अशातच प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील आता ब्रिटनीसाठी मैदानात उतरली आहे.

ब्रिटनी स्पीअर्स ही अमेरिकन पाॅप स्टार असून तिचं ‘बेबी वन मोर टाईम’ हे गाण सर्वात जास्त सुपर हिट झालं होतं. त्यानंतर ब्रिटनीने लोकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. मात्र ब्रिटनीचेे वडिल जेमी स्पीअर्स हेच ब्रिटनीच्या आयुष्याचे सर्व निर्णय घेतात. गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनी नैराश्येमध्ये होती. या काळात वडील तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. पण आता वडिलांचा हस्तक्षेप ब्रिटनीला नकोसा झाला आहे.

ब्रिटनीने याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. माझे वडील घोटाळेखोर असून त्यांना तुरुंगात टाका, अशी विनंती देखील तिने कोर्टात केली आहे. बुधवारी लॉस एंजिल्स कोर्टात तिच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ब्रिटनीने तिची व्यथा सांगितली. ब्रिटनी 445 कोटींची मालकीण आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहे. ब्रिटनीला आता यातून मुक्तता हवी आहे. अशास्थितीत सोशल मीडियावर ब्रिटनीच्या चाहत्यांनी ‘FreeBritney’ नावाची मोहिम सुरू केली आहे.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुद्धा ब्रिटनीच्या बाजुने मैदानात उतरली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य द्या, अशी मागणी करत रियाने तिच्या इन्स्टा अकाऊंट स्टोरी शेअर केली आहे. ‘तिला स्वतंत्र करा,’ असे तिने यात म्हटले आहे. यामुळे रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यापुर्वी देखील बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ती चर्चेत आली होती. तसेच त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात ती पुन्हा चर्चेत आली होती.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांना दिलासा नाहीच; सोमवारपासून ‘हे’ निर्बंध लागू

पुणेकरांसाठी खुशखबर! बहुप्रतिक्षीत ‘स्पुटनिक वी’ लस ‘या’ तारखेपासून मिळणार

“शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज, पवारांचा सल्ला मोदीही घेतात”

“पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं वागणं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं”

‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More