बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती होती आणि आता….’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. आर्यनच्या अटकेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. एनसीबीनं मोठी धाड टाकत मुंबई-गोवा-मुंबई क्रुझवरुन ड्रग्ज घेणाऱ्यांना अटक केलं आहे. यामध्ये आर्यन खानचाही समावेश आहे. अशातच आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही या प्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केला आहे.

आर्यन खानला दंडनीय गुन्ह्याअंतर्गत कठोर शिक्षा दिली जाऊ नये, असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी म्हटलं की, काही महिन्यांपूर्वीही असच झालं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही ताब्यात घेऊन तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आता आर्यन खानवर ही वेळ आली आहे, असं चौधरी यांनी म्हटलं आहे.

आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायनं सोमवारी दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी काय होईल याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, एनसीबीनं मुंबई-गोवा-मुंबई रेव्ह पार्टीत छापा टाकत आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा टाकला आहे. या छाप्यात त्यांनी ड्रग्ज करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. आता त्यांची चौकशी सुरु असून नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या”

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटील

पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा – नितेश राणे

“तुमच्याच घरात हे लोक कधी घुसतील अन् तुमचेच लोक तुरुंगात कधी जातील कळणार नाही”

मला ट्रोल करणाऱ्यांची दया येते, देव त्यांना…- अमृता फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More