महाराष्ट्र मुंबई

अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, भाऊ शौविकला दिलासा नाही

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला आहे. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती.

ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.

आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

महत्वाच्या बातम्या-

इरफान पठाणचा पुन्हा धोनीला अप्रत्यक्ष टोला, म्हणाला…

‘मुली ऊसाच्या शेतातच का सापडतात?’, हाथरस प्रकरणावरुन भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, देशातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जा- राहुल गांधी

सरकार आणि जनतेला मास्क कंपन्यांनी लुटलं, ‘इतक्या’ कोटींचा नफा कमावला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या