महाराष्ट्र मुंबई

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

मुंबई | ड्रग्ज प्रकरणी विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविक चक्रवर्ती याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली.

शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला होता. शौविक चक्रवर्तीने 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. शौविकला ड्रग्ज बाळगणं, खरेदी करणं आणि विक्री करणं अशा गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती. याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आली होती

एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

व्हाईटवॉश टळला! तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 13 रन्सने मात

लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- बाळा नांदगावकर

बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काही घेऊन जायला आलो नाही- योगी आदित्यनाथ

मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?- अशोक चव्हाण

“ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघाल्याचं हे आणखी एक उदाहरण”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या