रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; अंमली पदार्थ विरोधी पथकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!
मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं होतं. बॉलीवूडच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचं नाव समोर आलं. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आरोपी म्हणून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला. परंतु, रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीने आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं असून रिया चक्रवर्तीच्या जामीनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या 18 मार्चला सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर बॉलिवुडचं ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतच्या काही कर्मचाऱ्यांचा बॉलीवूडमधील काही बड्या लोकांशी झालेल्या संभाषणाच्या व्हाॅट्सॲप चॅट्स समोर आल्या होत्या. त्याआधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर, अनेक लोकांची चौकशी एनसीबीतर्फे करण्यात आली.
फेब्रुवारी 2021 मध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई विशेष न्यायालयात एक चार्जशीट दाखल केली आणि त्यामध्ये रिया चक्रवर्ती शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावं नमूद करण्यात आली होती. 11 हजार 700 पानांच्या चार्जशीटमध्ये जप्त करण्यात आलेला माल आणि त्यासंबंधीचे पुरावे तसेच आतापर्यंत जो तपास झाला त्या तपासाचे अहवाल जोडण्यात आले आहेत, एकूण 33 आरोपींपैकी आठ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून रिया आणि शोविक यांच्यासह इतर आरोपी जामीनावर सुटले आहेत.
थोडक्यात बातम्या –
सपना चौधरींच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
“मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे”
दोन मुलांच्या बापाने केलं असं काही की कोर्टाने सुनावली 212 वर्षांची शिक्षा!
नरेंद्र सिंह तोमर आणि राकेश टिकैत यांच्यात जुंपली, म्हणतात…
Comments are closed.