मनोरंजन

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

मुंबई | सुशांतच्या आत्महत्येचा तपास नव्या वळणावर जाऊन पोहचला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर रियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. सुशांत राजपूतसह लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या रियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रियावर करण्यात आलेल्या आरोपांवर तीनं अखेर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये रिया म्हणतेय की, माझा देवावर व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल.

माझ्याबद्दल प्रसारमध्यमात फार वाईट पद्धतीनं गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र माझ्या वकिलांनी याबाबत बोलण्यात स्पष्ट मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. लवकरच सत्य सर्वांच्या समोर येईल, असं मतही रियानं या व्हिडीयोतून व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी देखील सुशांतची गर्लफ्रेंड रियाची इडीकडून चौकशी केली जाणार आहे. रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करावी, अशी सूचना ईडीकडून बिहार पोलिसांना देण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचा विचार चालू असतो”

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात, यादी तयार- बच्चू कडू

“बोलता बोलता सरकारचे 5 वर्ष कधी पूर्ण होतील हे भाजपला कळणार पण नाही”

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही; अंकिता लोखंडेनं केले अनेक धक्कादायक खुलासे

दूध दराचे श्रेय घेण्यासाठी भाजप आंदोलन करतंय- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या