बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतचं आयुष्य बरबाद केलं म्हणणाऱ्या सुशांतच्या बहिणीला रियाचं प्रत्युत्तर, म्हणाली…

मुबंई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने( Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. त्याच्या मृत्यसंबधी अनेक गोष्टी समोर आल्या त्यातीलच एक म्हणजे सुशांत ड्रग्ज घेत होता, अशी बातमी समोर आली. सुशांतची प्रियकर असणाऱ्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीचं नाव समोर आलं होतं.

सुशांतची बहीण प्रियंका हिने 2019 मध्ये जेव्हा रिया सुशांतच्या आयुष्यात आली तेव्हापासूनच गोष्टी बिघडू लागल्या. आमच्यात सुद्धा अगदी कमी वेळात बऱ्याच गोष्टी बिनसल्या. रियाने माझ्या भावाचं आयुष्य उध्वस्त केलं, असा आरोप तीने रियावर केला होता. यावर आता रियाने इन्स्टावर (Instagram) पोस्ट करत याला उत्तर दिलं आहे.

गोगांटातून वर या. अहंकारातून बाहेर या. एवढी उंची गाठा की ते फक्त तुमच्याकडे बोट दाखवू शकतील, कारण तुम्ही तिथे आहात जिथे ते पोहचू शकत नाहीत. तुम्ही शांत आहात. तुम्ही प्रेमाने(Love) उंच भरारी घेत आहात. असं तीने लिहिलं आहे. ते लोक तुम्हाला शांततेच आणि सहानभूती निभाव न करण्याचं कारण देत आहेत. त्यांना हेैराण होऊ देत. तुम्ही जसे आहात तसे उत्तम आहात तुम्ही परिपूर्ण आहात. त्यांना तुम्हाला बोलायची संधी देऊ नका, असं रिया म्हणालीये.

हे मेसेज प्रियंकाला उद्देशून आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. रिया चक्रवर्तीचं नाव या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जोडण्यात आलं. नुकताच रिया आणि तिचा भाऊ शौविक याने अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला आहे, असा आरोप एनसीबीने (NCB) केला आहे.

थोडक्यात बातम्या

“फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, त्यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा”

अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच जाहिरीतीमध्ये दिसणार!

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका

“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More