बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिया चक्रवर्तीच्या ‘रिअल लाईफ हिरो’चा कोरोनाने घेतला बळी

मुंबई | कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना महमारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपल्या जवळच्यांना गमवावं लागलं आहे. यामध्ये अभिनेते, राजकारणी, अधिकारी, डॉक्टर्स यांनाही कोरोनाने आपलं शिकार केलं आहे. अशातच अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या काकांचं कोरोनाने निधन झालं आहेे.

‘रिटायर्ड कर्नल एस.सुरेश कुमार वीएसएम, एक नामांकित अर्थोपेडीक सुद्धा होते आणि एक खुपचं मायाळू वडील सुद्धा होते. तसेच एक सन्मानित अधिकारी होते. मात्र कोरोनाने त्यांना आमच्याकडून हिरावून घेतलं आहे. तुमचं कर्तृत्त्व सदैव आमच्या सोबत असेल, तुम्ही खऱ्या अर्थाने एक रियल लाईफ हिरो होता, अशी भावनिक पोस्ट रिया चक्रवर्तीने केली आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपल्या काकांचा फोटो शेयर केला आहे. त्यासोबतच तिने चाहत्यांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. कारण सुरक्षित राहण्याचा हाच एक मार्ग असल्याचं रियाने म्हटलं आहे. रिया आता सोशल मीडियावर फारच कमी सक्रीय दिसते.

दरम्यान, कोरोनामुळे अनेक बॉलिवूड कलाकरांनी जीव गमावला आहे. यामध्येअभिनेता जैन इमाम, पिया बाजपेई आणि निक्की तांबोळी यांनी आपल्या भावाला गमावलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला असून 18 वर्षावरील सर्वांना लस घेता येणार आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णाची दारुपार्टी; बायको-वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धरलं अन्…

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

‘हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना मदत करा’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील ‘या’ गावाचा घ्यावा सर्वांनी आदर्श, एकालाही नाही झाली कोरोनाची लागण

सिस्टम नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व फेल झालं- सोनिया गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More