Top News देश पुणे महाराष्ट्र

आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!

पुणे | इंटरनेट सेन्सेशन हा शब्द सध्या सगळ्यांच्याच परवलीचा झालाय, इथं कोण कधी कुठे कसा व्हायरल होईल काही सांगता येत नाही. राणू मोंडलपासून ते आताच्या शंकरपाळ्यापर्यंत कितीतरी जणांना इंटरनेटनं एका दिवसात झिरोचं हिरो बनवलं. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्या व्हिडीओनं साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलंय.

राघव नावाच्या रेडिओ जॉकीचा हा व्हिडीओ आहे. रेडिओ सिटीच्या कानपूर स्टेशनवर तो आपला शो करत असतो. शो दरम्यान वाजणाऱ्या गाण्यावर त्यानं स्वतःचं भान हरपून जे एक्स्प्रेशन दिले आहेत, ते लोकांच्या थेट काळजाला भिडताना दिसत आहेत. कारण जवळपास प्रत्येकाच्या व्हॉट्सअप तसेच इन्स्टाग्राम स्टेटसवर त्याचे व्हिडीओ झळकू लागलेले आहे.

ताल सिनेमातील ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर राघवने हे एक्स्प्रेशन दिलेले आहेत. त्याचे याच गाण्यावर एक्सप्रेशन देणारे आणखीही काही व्हिडीओ आहेत, त्यावरुन हे गाणं त्याच्यासाठी फारच खास असल्याचं दिसतंय. त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाही म्युझिक लव्हरला हा ट्रॅकग गुणगुणल्या शिवाय राहवत नाही.

दरम्यान, महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या त्याच्या या व्हिडीओची कल्पना मिळताच राघव फारच खूश झाला आहे. नमस्कार महाराष्ट्र… मी तुमचा खूप आभारी आहे. तु्म्ही मला जे भरभरुन प्रेम दिलं, ते असंच देत राहा, असं राघव मराठीतून म्हणाला आहे. आरजे सोनालीने त्याच्यासोबत लाईव्ह संवाद साधला. त्यावेळी त्याने मराठी लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि स्वतःबद्दल भाष्य केलं. खाली आपल्याला हा संवाद पाहता येईल.

आरजे राघवचा व्हायरल व्हिडीओ-

राघवसोबत सोनालीचा संवाद-

थोडक्यात बातम्या-

“दाढी वाढवून स्वत:ची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”

“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

शिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या