Top News खेळ

अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!

मुंबई | भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्येही खेळणार आहे. यंदाच्या वर्षीच्या आयपीएलच्या लिलावात अर्जुनने आपलं नाव दिलं आहे.

आयपीएलच्या लिलावात अर्जुनची बेस प्राईज ही 20 लाख रुपये आहे. क्रिकेटचा देव म्हणून गणला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलाला कोण आपल्या संघात घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा आयकॉन प्लेयर राहिलेल्या सचिनच्या मुलाला मुंबईच्या संघातून खेळवण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.

यंदाच्या लिलावात अर्जुनप्रमाणे मुख्य आकर्षण म्हणजे एस. श्रीसंत. आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सापडलेला श्रीसंत तब्बल 7 वर्षांनी पुनरागमन करत आहे. तर भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराही या लिलावात सहभागी झाला आहे.

दरम्यान, पुजारासोबत हनुमा विहीरीनेदेखील आपलं नाव लिलावाच्या यादीत टाकलं आहे. विहारीची बेस प्राईज ही 1 कोटी तर पुजाराने आपली बेस प्राईज 50 लाख इतकी ठेवली आहे.

थोडक्यात बातम्या-

सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे या वेबसिरीज विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

“अनुपम खेर तुझं आता काही खरं नाही; पिसारा फुलवून पार्श्वभाग दाखवणाऱ्या मोरासारखी अवस्था झालीय

“मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?”

‘हा’ चित्रपट ठरला सर्वांचा बाप! रिलीझ होण्याआधी कमवले 348 कोटी

मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा- रतन टाटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या