अनुपची अग्निपरिक्षा; ज्यांच्यासाठी खेळला आता त्यांच्याच विरोधात खेळणार

चेन्नई | प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला सुरूवात झाली असून आज होणाऱ्या यु मुंबा विरूद्ध जयपुर पिंक पँथर्स या सामन्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण हा सामना यु मुंबा विरूद्ध अनुप कुमार असा होणार आहे. 

प्रो कबड्डीच्या गेल्या पाच पर्वात यु मुंबाचं नेतृत्व अनुपने अगदी यशस्वीपणे सांभाळले. मात्र सहाव्या पर्वात यु मुंबाने त्या बाहेर केलं असून जयपुरने संघात घेत नेतृत्वाची जबाबदारी त्याला दिली आहे. 

यशस्वी कॅप्टन म्हणून अनुपची ओळख आहे. या झालेल्या बदलामुळे अनुपला नेतृत्व केलेल्या संघाचा सामना करावा लागणार आहे. 

दरम्यान, आजच्या सामन्यात अनुपने चढाईत 11 गुण मिळवले तर त्याचे 500 गुण पुर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-एका पायानेच तो 10 किलोमीटर धावला; अन झिंगाट गाण्यावर बेधुंद नाचला- पाहा व्हिडिओ

-राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पक्का, यांची खुर्ची धोक्यात?, तर यांना मिळणार संधी?

-तिच्या आरोपात तथ्य असेल तर नानांवर कारवाई झालीच पाहिजे!

-अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय- देवेंद्र फडणवीस

-मी राजकारणात आले तर तिसरं महायुद्ध घडेल!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या