Top News महाराष्ट्र सातारा

साताऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘या’ अभिनेत्रीचा रोड शो

सातरा | सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं वार घुमत असून गावातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतं आहे. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावांमधील पॅनल आणि मंडळं नवनवीन शक्कल लढवत असल्याचं दिसून येतं आहे.

याच पार्श्वभूमीवर सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावातील अजिंक्य पॅनेलनं यावेळी निवडणूक प्रचारासाठी थेट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनाच आमंत्रण दिलं. प्रिया बेर्डे यांनी जिप्सी गाडीतून गावात रोड शो करl प्रचाराची सांगता केली. त्यावेळी प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

वाढे गावात 11 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. सध्या अनुसुचित जमातींची व्यक्ती गावात नसल्यामुळे 10 जागांवर ही निवडणूक लढवली जात आहे. या गावात पाणी योजना, गावातील बंदिस्त गटारे, गावची विकासाची प्रलंबित कामे अशा मुद्द्यांवर ही निवडणूक होतेय.

दोन्ही पॅनेलकडून समोरासमोर एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळं दोन्ही पॅनेल ताकदीनं निवडणूक लढत असल्यामुळं निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर….’; रतन टाटांनी आपल्या कामगारांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या