सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल

Pune News | पावसाळा सुरु की कुठेतरी मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याचा विचार सर्वांच्याच मनात येतो. अशातच पुणेकर पावसाळ्यात सिंहगडावर गर्दी करतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. मात्र आता पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजेच 23 मे पर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पुढील दोन दिवस सिंहगडावर जाण्याचा रस्ता बंद राहणार :

जर काही पर्यटकांना या कालावधीत सिंहगडाला भेट देयची असेल तर ते अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाऊ शकतात. मात्र गुरुवारपर्यंत सिंहगड किल्ल्यावर कोणतेही वाहन जाऊ शकणार नाही. सिंहगडावरील दरडी या पावसाळ्यात अनेकदा कोसळतात. त्यामुळे अशा धोकादायक दरडी पासून सुटका होण्यासाठी त्या दरडी आधीच दुरुस्त करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

पुणेकरांची सिंहगडावर पावसाळ्याच्या दिवसांत प्रचंड रेलचेल असते. अनेकजण सिंहगडावर जातात. मात्र कधी कधी दरड कोसळल्याने रस्ता अचानकपणे बंद होतो. त्यामुळे पर्यटक अडकून राहिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडू नयेत म्हणून ही खबरदारी वन विभाकडून घेण्यात आली आहे.

Pune News | सिंहगडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद का आहे? :

गेल्या वर्षभरापूर्वी वन विभागाने दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास केला होता. त्यावेळी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या देखील बसवण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निघाल्या होत्या. मात्र वनविभागाच्यावतीने यावर्षी जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात देखील आले आहे. या जाळ्या बसवण्याचे काम सध्या सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी सिंहगडावरील रस्ता पुढील दोन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे जर तुम्ही वाहनानी सिंहगडाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पुढील दोन दिवस थांबावे लागणार आहे. याशिवाय ज्या पर्यटकांना चालत सिंहगडाला भेट देयची असेल ते अतकवाडीमार्गे गडावर जाऊ शकतात.

News Title – Road to Sinhagad closed for vehicles till May 23

महत्त्वाच्या बातम्या-

आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी

पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

या राशीच्या व्यक्तींचा गैरसमजातून वाद वाढू शकतो

बजरंग सोनवणे बीडच्या स्ट्राँगरूममध्ये धडकले, काय घडलं नेमकं?

युवकाने तब्बल आठ वेळा भाजपला केलं मतदान, व्हिडीओ आला समोर