Top News मनोरंजन

‘रिया चक्रवर्ती माझी..’; रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं त्या फोटोबाबत दिलं स्पष्टीकरण, म्हणाला….

मुंबई | बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंहची त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. अशातच  रोडिज फेम राजीव लक्ष्मणसोबत काढलेल्या फोटोने रिया पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

या फोटोमध्ये रिया राजीवच्या गळ्यात पडलेली दिसत असून ती खूप आनंदी असल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो सोशल माध्यमांवर शेअर करत राजीवने ‘My Girl’ असं म्हटलं होतं. मात्र यामुळे रिया चांगलीच ट्रोल झाली.

नेटकऱ्यांनी इतकं ट्रोल केलं की राजीवने हा फोटो हटवत त्या फोटोबाबत स्पष्टीकरण दिलं. मला वाटतं मी चुकीचा शब्द वापरला आणि कोणत्याही कारणाशिवाय अडचण ओढावून घेतली असल्याचं राजीवने म्हटलं आहे.

दरम्यान, रिया माझी जुनी मैत्रीण आहे आणि तिला पुन्हा भेटल्यानं मी खूप आनंदी आहे. तिचं सर्व चांगलंच व्हावं अशीच प्रार्थना मी करतो, असं राजीवने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

धक्कादायक! मुंबईमध्ये 19 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार

नाद करा पण जडेजाचा कुठं! आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग; पाहा व्हिडीओ

कांगारूंच्या धरतीवर रोहित शर्माचं नाणं खणखणलंच; ‘हा’ विक्रम केला नावावर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या