बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रस्ते बांधणं म्हणजे ‘रॉकेट सायन्स’ नाही, ठाकरे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत…”

मुंबई | आगामी महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सध्या राजकीय खलबतं सुरु झालेली पहायला मिळत आहे. यातच आता खड्ड्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. सध्या मनसे नेते अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यांच्या झालेल्या बिकट परिस्थितीवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अमित ठाकरे यांनी सगळयांचं लक्ष वेधलं आहे. नाशिकमध्ये मनसेनं चांगले रस्ते बांधले, रस्ते बांधणे म्हणजे हे रॉकेट सायन्स नाही. आम्ही 5 वर्षात नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले, तुम्ही 25 वर्षात का नाही बांधू शकत, असा खोचक सवाल अमित ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत रस्ते हे सुधारणार नाहीच, मी तुम्हाला बोललो, रस्त्यावर आलेले नेते आहेत ते तीन दिवस दिखावा म्हणून आलेले आहेत. तीन चार दिवसात लोक विसरतील, त्यानंतर काहीही होणार नाही, असंही अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही अमित ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्यांवर ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की, खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल. त्यांच्या पोस्टनंही राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजवली होती.

थोडक्यात बातम्या – 

‘आईस्क्रीम की इडली ?’, शशी थरूर यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

स्पर्धा परीक्षेचा आणखी एक बळी! अपयशानं विद्यार्थ्यानं उचललं धक्कादायक पाऊल

स्मृती मंधानाचं ऐतिहासिक शतक! अशी कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर

“कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर फोन करा”

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More