बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, एकाला थेट गोळी घातली, पाहा व्हिडीओ-

पुणे | राज्यात सध्या सातत्यानं दरोड्याच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची परिस्थिती सध्या दरोड्यांमुळं निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शिरूर येथे महाराष्ट्र बॅंकेवर (Maharastra bank Roberry) दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर आता जुन्नर तालुक्यात फाटा नंबर 14 येथे सशस्त्र दरोडा (Armed robbery) पडल्याची घटना घडली आहे.

24 नोव्हेंबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हातात शस्त्र घेऊन काही अज्ञात दरोडेखोरांनी अनंत पतसंस्थेवर दरोडा टाकला आहे. बँकेतील पैसा लुटण्याच्या उद्देशानंच या दरोडेखोरांनी हल्ला केला होता. परिणामी बॅंकेतील उपस्थित नागरिकांना प्रतिकार सुद्ध करायचा वेळ मिळाला नाही. या दरोड्यात 2 लाख 50 हजार रूपये रक्कम लुटण्यात आली आहे.

दरोडेखोरांच्या हल्ल्याला प्रतिकार करत असताना बॅंकेचे व्यवस्थापक दशरथ भोर यांना गोळी घालण्यात आली. या गोळीबारात दशरथ भोर यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी बॅंकेत महिला देखील उपस्थित होत्या. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा आणि नारायणगाव पोलीस स्थानकातील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आहेत.

दरम्यान, जुन्नर भागातील आसपासच्या सर्व पोलीस स्थानकांना या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. दशरथ भोर यांच्या मृत्यूनं सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या

अनिल देशमुखांना मोठा दिलासा?, परमबीर सिंहांबाबत धक्कादायक माहिती उघड

राज्याच्या राजकारणात नवे संकेत, फडणवीस-ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

खासदार असदुद्दीन ओवेसींनी वाहतुकीचा नियम मोडल्याने भरावा लागला 200 रुपयांचा दंड

चला मला अटक करा!, कंगनानं पोस्ट केला वाईन पितानाचा हॉट फोटो

कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More