बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीने जप्त केलेल्या डिएसकेंच्या बंगल्यातच झाली चोरी

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डि.एस.कुलकर्णी हे गेल्या चार वर्षांपासून तुरूंगात आहेत. हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर ईडीने त्यांचा पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराजवळील बंगला देखील जप्त केला होता. ईडीने जप्त केलेल्या याच बंगल्यात आता चोरी झाली आहे.

डि.एस.कुलकर्णी यांचा चतु:श्रृंगी मंदिराजवळ तब्बल 40 हजार स्क्वेअर फुट बांधकाम असलेला ‘चतु:श्रृंगी’ हा बंगला आहे. 2006 साली बांधलेला हा बंगला कुलकर्णी यांच्या अटकेनंतर ईडीने जप्त केला. तेव्हापासुन हा बंगला बंदच आहे. पण डि.एस.कुलकर्णींच्या याच बंगल्यात चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली आहे.

भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 16 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत चोरीचा हा प्रकार घडला आहे. बंगला बंद होता पण चोरीचा संशय आल्याने फिर्यादी महिलेने ईडीचे अधिकारी, पोलिस यांच्या समक्षच बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर बंगल्याच्या दरवाजाचे सील आणि लॉक तोडून कोणीतरी बंगल्यात प्रवेश केल्याचं उघड झालं.

चोरट्यांनी बंगल्यातून 18 एलईडी टि.व्ही, लॅपटॉप, कंप्युटर, कॅमेरा, गिझर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पिठाची गिरणी आणि इतकंच नाही तर देवघरातील चांदीच्या वस्तूही लंपास केल्या असल्याचं भाग्यश्री यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. या चोरट्यांनी जवळपास 6 लाख 95 हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढचा तपास करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

टाटानंतर आता राकेश झुनझुनवालांना मिळाले पंख, वाचा सविस्तर

अजब चोरीची गजब कहाणी! शेतकऱ्याचा 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी केला लंपास

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत गेल्या 24 तासात लक्षणीय घट

कोरोना नियमांचं पालन न केल्यास भरावा लागणार ‘इतक्या’ हजारांचा दंड

इंधन दरवाढीवर आज पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More