बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

असापण फ्रॅाड!; फेसबुक लाईव्ह केलं तर एका झटक्यात 26 हजारावरुन बिलाची रक्कम झाली 6 हजार!

नाशिक | कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत असते, हे वेळोवळी पाहायला मिळत आहे. रेमडेसिवीर औषध चढ्या किंमती लावून विकलं जात आहे. आता चक्क रुग्णालयातील मेडिकलच रुग्णांच्या औषधावर मोठ्या प्रमाणावर किंमती वाढवून नातेवाईकांची लूट करताना दिसत आहेत. नाशिक रोडच्या दिव्यज्योत रुग्णालयातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुकवरच्या पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक महिला कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना आणायला लावलेल्या औषधाची यादी दाखवते. यात रुग्णालयातील मेडिकलने दिलेल्या औषधांच बिल 26782 रुपये इतकं आलं होतं. बाहेरील मेडिकलमध्ये औषधांची लिस्ट दाखवल्यानंतर त्याच कंपनीची औषधं 6 हजार रुपयांना बसतात.

याचा जाब कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला विचारला. यावर डॉक्टरांचं म्हणणं आहे की, आम्ही फक्त इंजेक्शनचे पैसे घेतो. इंजेक्शनचे पैसे दिल्यावर पेशंटला डिस्चार्ज दिला जाईल. रूग्णालयातील मेडिकलमध्ये आणि बाहेरील मेडिकलमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 20 हजारांचा फरक होता. यानंतर या कार्यकर्त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. त्यानंतर रूग्णालयातील मेडीकलला नमती भूमिका घ्यावी लागली.

कार्यकार्त्यांनी लाईव्ह व्हिडिओ शुट केल्यानंतर मेडीकलने 26 हजारचं बिल रद्द करून 6 हजार केलं. तर लगेच पेशंटला डिस्चार्ज दिला जाईल असं देखील सांगितलं. त्यानंतर कार्यकार्त्यांनी रूग्णालयालात भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. फक्त नाशिक भागातच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागातही ही सामान्य लोकांची लूट केली जात आहे. त्यामुळे या बाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॅाकशाही’ आहे, 2 मे ला सर्वांना धक्का बसेल”

शिवसेनेनं भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपुढे ठेवला ‘हा’ नवा पर्याय!

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आता सहज मिळू शकतं!

अर्धशतकानंतर नितीश राणाचं खास सेलिब्रेशन; जाणून घ्या विशेष कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More