देश

रॉबर्ट वढेरा यांना न्यायालयाचा दिलासा; 16 फेब्रुवारी पर्यंत अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना दिल्लीतील न्यायालयानं दिलासा दिला आहे. रॉबर्ट वढेरा यांना न्यायालयानं 16 फेब्रुवारी पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

लंडन येथील 12 ब्राइट स्क्वेअर येथील संपत्ती खरेदी करताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून रॉबर्ट वढेरा यांच्या विरोधात खटला दाखल केला होता.

राबर्ट वढेरा यांचे जवळचे सहकारी मनोज अरोरा यांना न्यायालयानं 6 फेब्रुवारी पर्यंत जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, मनोज अरोरा हे रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटलिटी एलएलपीचे कर्मचारी असून वढेरा यांच्या विदेशातील अघोषित संपत्तीबद्दल अरोरा यांना माहिती होती, असा चौकशी करणाऱ्या संस्थांनी दावा केला होता.

महत्वाच्या बातम्या-

बाऊन्सर मानेवर बसला आणि ‘या’ क्रिकेटपटूची वाचा गेली

-“शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम”

काँग्रेसच्या धोरणांमुळेच मुस्लीम समाज प्रगतीपासून वंचित- अमित शहा

-विरोधी पक्षांच्या सरकारांकडून कर्ज नसणारांनाही कर्जमाफी मिळाली- नरेंद्र मोदी

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचे नितीन बानुगडे लढणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या