बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!

जयपूर | काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जयपूरच्या मोती दुंगरी गणेश मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारी अधिकारी आणि यंत्रणांचा वापर चुकीचा होत आहे आणि प्रत्येकवेळी मला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नुकतीच आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांना माझ्याशी किती प्रश्न विचारायचं ते विचारू द्या मी सगळ्या प्रश्नांना उत्तरं देईल असंही ते बोलले.

गेली 25 वर्षे मी राजकारणात येण्याचा कधीही विचार केला नाही पण, माझं नाव वापरून नेहमी राहुल आणि प्रियंका यांच्यावर आरोप आणि टीका केल्या जातात त्यामुळे आता मी राजकारणात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गांधी घराण्याशी थेट संबंध असलेली चौथी व्यक्ती आता रॉबर्ट वाड्रा यांच्या माध्यमातून राजकारणात येईल.

थोडक्यात बातम्या-

लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ

‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया

‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More