श्रीमंतांना लुटून गरिबांचं भलं करणाऱ्या ‘रॉबिनहूड’ला अटक

नवी दिल्ली | दिल्लीतील श्रीमंतांच्या घरांमध्ये चोरी करायची आणि बिहारमधील गरिबांना मदत करायची हा दिल्लीतील २७ वर्षीय इरफानचा खाक्या. मात्र असं रॉबिन हूड बनणं त्याच्या चांगलंच अंगलट आलं असून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

पोलिस त्याचा शोध घेत बिहारमधील पुपरी या गावात गेले तेव्हा तेथील लोकांनी तो समाजसेवक असल्याचं सांगितलं. 

धक्कादायक बाब म्हणजे त्याची एक प्रेयसीही आहे. तीने अनेक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलंय. तिलाही इरफानच्या कारमान्यांचा पत्ता नसल्याचं समोर आलंय. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या