Top News राजकारण

जलयुक्त योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले?; रोहित पवारांची टीका

पुणे | फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

रोहित पवार म्हणाले, “जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.”

दरम्यान कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आलेत. अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यात जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरली, असंही ‘कॅग’ने म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

…तर सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे- छगन भुजबळ

…अन् ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपकडून वसूल करा- सचिन सावंत

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या