बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट

जळगाव |  आज फादर्स डे… या निमित्ताने भाजप नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांचे वडिल एकनाथ खडसे यांच्यासाठी भावूक पोस्ट लिहीली आहे. एकनाथ खडसे यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या पैलूंचं दर्शन त्यांनी या पोस्टमधून घडवलं आहे.

रोहिणी खडसे यांची फेसबुक पोस्ट-

“बाबा … तुम्ही माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहात. तुमच्या परीस स्पर्शाने आमचे जिवन सुवर्ण चकाकी घेत आहे तुम्ही आमच्यावर केलेले संस्कार, उपकार मोजता येईल असं एकही ‘माप’ या जगात शोधूनही सापडणार नाही…बाबा तुमचे उपकार फेडणे या जन्मी तरी शक्य नाही.  तुम्ही मला खूप काही दिलं… संघर्षाच्या वाटेवर चालायला शिकवलय, सुखदुःख विसरुन जगायला शिकवलं,  अंधारातून प्रकाशाची वाट शोधायला शिकवलं,  ज्ञान देऊन दुनियातील माणसे ओळखायला शिकवलं…
बाबा तुम्ही मला खूप काही दिलं… आपल्या माणसावर प्रेम करायला शिकवलं, मनाने खचलेल्या व्यक्तींचा भरोसा व्हायला शिकवलं, स्वार्थाचा त्याग करून स्वाभिमानाने जगायला शिकवलं…..

आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला,  बाबा तुम्ही सोबत असल्यावर हे आकाश सुद्धा ठेंगण वाटतं, अंगामध्ये हत्तीच बळ येतं, तुम्ही सोबत असल्यावर हे संपूर्ण जग अगदी मुठीत आल्यासारखं वाटतं. तुम्ही माझा आत्मविश्वास आहात पृथ्वीवर देवाची ओळख आहेत तुम्ही, प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, आमच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,  आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकले आहे. तुमची साथ आशीर्वाद असेच वर्षानुंवर्ष कायम राहो”

आज सोशल मीडियावर अनेक जण आपापल्या वडिलांसाठी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करत आहेत. फादर्स डे च्या निमित्ताने रोहिणी खडसेंनी एकनाथ खडसेंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

गुड न्यूज! अखेर कोरोनावर औषध सापडलं, डीजीसीआयकडूनही मिळाली परवानगी

नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 823 रुग्ण

बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री; छाप्यात ‘इतक्या’ लाखांचा माल जप्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More