बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे; रोहित-चहलची शाब्दिक मस्ती

लंडन |  बांगलादेशला नमवून टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडिया सध्या लीड्समध्ये आपला वेळ घालवत आहेत. युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर रोहित शर्माने मजेशीर कमेंट केली आहे.

युजवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका ब्रॅण्डच्या कपड्यांच्या जाहिरातीकरिता केलेल्या फोटोशुटचा फोटो टाकला होता. यावर तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे, अशी कमेंट रोहित शर्माने केली. ही कमेंट चाहत्यांमध्ये व्हायरल झाली.

रोहित-चहलमध्ये चांगली मैत्री आहे. या दोघांमधली मैत्री निखळ आहे. सातत्याने एकमेकांच्या फोटोवर हे दोघेही कमेंट करताना दिसून येतात.

दरम्यान, शनिवारी भारताचा श्रीलंकेविरूद्ध सामना होत आहे.


महत्वाच्या बातम्या-

-भारत रोजगार देणारा देश बनला आहे- निर्मला सीतारामन

-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडली ‘ही’ परंपरा

-ब्रायन लारा म्हणतो विराट ‘रनमशीन’ पण मी ‘या’ खेळाडूचाच जबरा फॅन

“पक्षाने माझ्या मुलावर कारवाई करावी, हा वाद मी संपवू इच्छितो”

-“राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More