Top News खेळ

टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित-इशांत शर्मा पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून बाहेर

नवी दिल्ली | टीम इंडियाच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. ऑस्ट्रेलिया दौरा सुुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मा आणि गोलंदाज इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहेत. यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झालीये.

आयपीएलदरम्यान रोहित आणि इशांत या दोघांना दुखापत झालेली. यामुळे रोहितची निवड ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारतीय संघात निवड केली नाहीये. परंतु त्यानंतर रोहितने आयपीएल सामने खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे रोहितला कसोटी संघात स्थान देण्यात आलं.

रोहितप्रमाणे इशांत शर्माही पूर्णपणे फिट झालेला नाहीये. कसोटी क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर दोघांनाबी फिटनेसकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ईडीने घेतलं ताब्यात

राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार- राजेश टोपे

शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्या घरावर ईडीचा छापा

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या