मनोरंजन मुंबई

…म्हणून मी मिरवणूकीत सहभागी झालो- रोहित पवार

मुंबई | सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. मात्र यामध्ये माझा कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी बांधिलकी जपतो ती या लोकांशी अन् या मातीशी,  अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर केली आहे.

लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली होती. ही लोकं म्हणजे नेमके कोण तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसं. अगदी 10-10 रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता. त्यामुळे त्यांचा आग्रह मी मोडणार नव्हतोच कारण त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या, असंही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपल्या आनंदामुळे एखाद्या व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं, असा माझा कधीच हेतू नव्हता आणि भविष्यातही नसेल, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले हाते. मात्र रोहित पवारांची त्यांच्या मतदारसंघात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे रोहित पवारांवर जोरदार टीका होत होती.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या