बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूर पालखी सोहळ्याबाबत आमदार रोहित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | कोरोनाचं संकट असल्याने पालखी सोहळा होईल की नाही याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. याबाबत वारकरी संप्रदायातील अनेक मंडळींनी नियोजनाबाबत माझ्याशी फोनवर संपर्क साधून आपलं मत मांडलं. हा सोहळा व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे. प्रतिबंधात्मक निकष पाळून हा पालखी सोहळा पार पाडता येईल का, याबाबत विचार व्हायला हवा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता आहे. त्यावर रोहित पवार यांनी फेसबुकद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे.

वारीची परंपरा ही जात, धर्म, पंथ, प्रांत, स्त्री-पुरुष, गरिब-श्रीमंत, लहान-मोठा अशा भेदभावाला दूर करत भक्ती, समता, एकात्मता, बंधुता जपत असते. त्यामुळे हा सोहळा व्हावा, असं मलाही वैयक्तिकरित्या मनापासून वाटतं, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, दिंड्या दरवर्षीच आपल्या शिस्तीचं दर्शन अवघ्या जगाला घडवत असतात. यंदा गावोगावच्या भाविकांनाही अशाच शिस्तीचं अधिक कठोर पालन करावं लागेल, किंबहुना कुणीही पालखीजवळ यायचं नाही, असाही नियम करता येईल, असं रोहित पवारांनी सांगितलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांनी केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

कोरोनाचा सामना करण्यासाठी अझीम प्रेमजी यांनी मोदी सरकारला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

केंद्राने सावकाराचं काम करू नये; मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे- राहुल गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More