“बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे तुम्हाला माहित नसेल”

Rohit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यामधील मतदान पार पडलं. उद्या 20 मे रोजी पाचवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात बीड मधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडालीये.

बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीत उभ्या राहिल्या आहेत. तर, महाविकास आघाडीकडून येथे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं. बीडमध्ये मतदान पार पडलं असलं तरी आता रोहित पवारांच्या आरोपांमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ बीडच्या परळी येथील असल्याचं म्हटलं जातंय. या व्हीडिओत एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राजवळ उभ्या असलेल्या मतदाराला एक व्यक्ती सूचना देताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती मतदारांना कोणते बटन दाबा, हे सांगताना दिसत आहे.

यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एक ट्वीट देखील केलं आहे. परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांनी याचे काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत.

रोहित पवारांचे ट्वीट चर्चेत

बीड जिल्ह्यात विशेषत: परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

“बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा परळी पॅटर्न”

यापूर्वी रोहित पवारांनी बारामतीबाबतही असेच आरोप केले होते. त्यांनी बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यात आल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी बीडबाबत असाच आरोप केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

“बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजा ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल”, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

News Title-  Rohit Pawar alleged that voters were pressured in Beed

महत्त्वाच्या बातम्या –

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती

“बॉयफ्रेंडने बाथरुममधला व्हिडिओ..”; पुनम पांडेचा पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा

‘या’ भागांत तापमान जाणार 40 शी पार?; हवामान विभागाचा हायअलर्ट

चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल

‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून मोठा धनलाभ होईल!