बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार

मुंबई | शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. पडळकरांच्या या टीकेला रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

पवारसाहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात हे मी विचारणार नाही, असं रोहित पवारांनी म्हटलंय.

पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे

‘केवळ कलाकारांच्या मागे हात धुऊन लागू नका’; केंद्राचे एनसीबीला आदेश

‘रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा’; ‘या’ नेत्याने केली मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More