बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सकाळी 6 ते रात्री 11 अजितदादांच्या कामाचा धडाका, डिपॉझिट उगीच जप्त होत नाही”

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आयकर विभागाच्या त्यांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या धाडीनंतर पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवारही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांच्या कामाचं रोहित पवारांनी तोंडभरून कौतूक केलं आहे.

फेसबूकवर त्यांनी एक पोस्ट लिहून भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी अजित पवार एक असल्याचं म्हटलं आहे. तसेच गेल्या तब्बल 30 वर्षांपासून हा शिरस्ता कायम असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे. आज अजित पवारांसोबत असताना आलेला अनूभव त्यांनी समाज माध्यमावर शेअर करत अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं.

अजित पवारांचं काम कायमच जवळून पाहिलेल्या आमदार रोहीत पवारांना आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्तुत्वाची भूरळ पडली असून विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हे माझंं भाग्यच आहे, अशा शब्दात रोहीत पवारांनी अजितदादांबद्दल असलेल्या भावनांना वाट करून दिली.

गेल्या 30 वर्षांपासून अजित पवारांचा हा शिरस्ता कायम असल्याचं म्हणत विरोधकांचं डिपाॅजिट उगाच जप्त होत नाही, असंही या फेसबूक पोस्टमध़्ये रोहीत पवार म्हणाले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या – 

“देशाचे पंतप्रधान लखनऊला आले पण लखीमपूरला आले नाहीत”

“गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत, त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असणार”

पठ्ठ्याने आयफोन 12 मागवला, Flipkart ने भलतंच काही पाठवलं, व्हिडीओ पाहून सगळेच हैराण!

“मला नेहमी वाटायचं की सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे”

“..त्यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा नाहक त्रास देतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More