बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पवारांनी उभारले 1750 बेड्सचे कोव्हिड सेंटर, तुमचा आमदार-खासदार काय करतोय?

अहमदनगर | कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात कोव्हिड सेंटर उभारल्याची माहिती दिली होती. मतदारसंघातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी नागरिकांसाठी रोहित पवार हे सतत झटत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

रोहित पवार यांनी कर्जतमध्ये आता 350 बेड असलेल्या कोव्हीड सेंटरचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आपल्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. तसेच ते कोव्हिड सेंटर हे उद्याच रुग्णांसाठी सुरू होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरून मोठ्या प्रमाणात राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच रोहित पवारांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचं बोललं जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील कर्जतमध्ये एकूण 900 बेड तर जामखेडमध्ये एकूण 850 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. एकीकडे कोरोनाकाळात राजकारण सुरू असताना दुसरीकडे रोहित पवारांसारखे संवेदनशील राजकारणी नागरिकांप्रती असलेली तळमळ आपल्या कामामधून दाखवून देत आहेत.

एक आमदार आपल्या मतदारसंघांमध्ये 1750 बेड असलेलं कोव्हिड सेंटर उभारतोय. राजकारण बाजूला ठेवून जर सर्वपक्षीय नेत्यांनी आणि आमदार खासदारांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये साथ दिली तर नक्कीच आपण या महामारीच्या संकटावर लवकरच मात करू शकतो. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असताना राजकीय वर्तुळात मात्र एकमेकांवर टीका करायला चांगलंच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस द्या”

बिनधास्त लस घ्या! लसीकरणानंतर कोरोना होण्याचं प्रमाण केवळ 0.01%

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

‘हे केंद्र सरकारचं काम नाही, जबाबदारी राज्यावर सोपवावी’; राज ठाकरेंचं मोदींना दुसरं पत्र

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार- राजेश टोपे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More