“गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडलं असतं”

Dhananjay Munde, Walmik Karad

Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर तीव्र संताप उसळला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेषतः, या प्रकरणात आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याच्या आरोपांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

“राज्यात गुंडांनी कायदा-सुव्यवस्थेवर लघवी केली”

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत, “बीडमधील गुंडांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर लघवी केली आहे,” अशी जळजळीत टीका केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “हे फोटो आणि रिपोर्ट काल आमच्याकडे आले, पण दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे फोटो पोहोचले असतील. मग त्यांनी धाडसी निर्णय का घेतला नाही?” असा सवाल करत, त्यांनी सरकारवर आरोपींच्या पाठीशी उभे राहिल्याचा आरोप केला.

Dhananjay Munde | “धनंजय मुंडेंचा राजीनामा तात्काळ घ्या”

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, “तुमच्या वैयक्तिक मैत्री किंवा संबंधांना कचऱ्यात टाका, पण धनंजय मुंडेंचा आजच राजीनामा घेतला पाहिजे.” वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे आणि तोच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मग, सरकार दोन महिन्यांपासून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे? असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणावर संताप व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, “थोरले मुंडे (Gopinath Munde) आज असते, तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकाने मारले असते.” तसेच, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही या प्रकरणावर समोर येऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

विरोधक आता आगामी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरात करत आहेत. तसेच, सरकारवर आरोपींचे संरक्षण करण्याचा आरोपही लावला जात आहे. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जातो की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .