Top News पुणे महाराष्ट्र

महासागराप्रमाणे खोली अन्…!म्हणत रोहित पवारांनी आजोबांना दिल्या खास शुभेच्छा

बारामती | राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा जन्मदिवस आहे. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही ट्विट करत आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. राजकीय जीवनात अनेक पवारांच्या वाट्याला अनेक चढउतार  आले. मात्र कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही. म्हणून त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, ‘पवार साहेब..एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे,एक मोहीम,एक वसा आहे!राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे! आदरणीय पवार साहेबांना 80व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

जय जवान, जय किसान; वाढदिवसाच्यानिमित्त युवराज सिंगचं चाहत्यांना ‘खास’ आवाहन

आप्पा, तुम्ही अजूनहीआमच्यातच आहात, धनंजय मुंडेंनी गोपीनाथ काकांना केलं अभिवादन

रेमो डिसुझाच्या प्रकृतीबाबत मित्राने दिले अपडेट्स, म्हणाला…

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या