बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारला दिला लसीकरणाबाबत ‘हा’ सल्ला 

पुणे | कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं रूग्णसंख्येमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी लसींचा तुटवडा देशभरात जाणवत आहे. त्यामुळं संंपूर्ण लसीकरणाची मोहीम ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लसीकरणासाठी पैसा कसा उभा करायचा याबाबतचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे.

राज्य स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

देशाला लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारनं व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावं. त्यासाठी बजेटमध्ये केलेली 35 हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील, असा सल्ला रोहित पवार यांनी केंद्राला दिला आहे.

दरम्यान, आरबीआयनं केंद्र सरकारला 99 हजार कोटी रुपयांचा सरप्लस निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा निधी मिळणार आहे. जुलै 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंतची ही सरप्लस रक्कम केंद्र सरकारकडे जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या –

दीरानेच घातली वहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड, धक्कादायक कारण आलं समोर

“उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं, तेच खरे शिवसैनिक”

पुण्यातील धक्कादायक घटना; महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण केली अन्…

संतापजनक! प्रेमविवाहानंतर गर्भपात न केल्यानं महिलेवर अत्याचार

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे सिद्ध होत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More