बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काहीजण वडिलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागत असेल तर हे…’; रोहित पवारांची मोदींवर टीका

मुंबई | कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे वेळोवेळी केंद्र सरकारवर टीका करताना दिसतात. आता खासगीकरणाच्या मुद्द्यावरून तसेच मोदी सरकारच्या विविध धोरणांवरून रोहित पवार यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

एखाद्या कुटुंबाच्या वाट्याला वडिलोपार्जित मालमत्ता येते. त्या कुटुंबातील पुढची पिढी कर्तृत्ववान असेल तर ती आपल्या संपत्तीत वाढ करते पण काहीजण या संपत्तीत वाढ करण्याऐवजी वडिलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागवत असेल तर हे त्या कुटुंबाच्या अधोगतीचं लक्षण असतं. अशीच काहीशी परिस्थिती आज देशात बघायला मिळतेय. सरकारी कंपन्या या आपली राष्ट्रीय संपत्ती असून देशाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय. पण केंद्र सरकारने या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सरकारी कंपन्या अडचणीत असतील तर त्यावर उपाय शोधला पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

आज देशभरात कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. खरंतर कृषी हा राज्य सूचीतला विषय आहे. या विषयावर राज्यांच्या विधानसभांनी केंद्र सरकारला कायदा करण्याची विनंती केली किंवा आंतरराष्ट्रीय करारानुसार कायदा करण्याची गरज असेल तर केंद्र सरकार राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकतं. परंतु अशी कुठलीही परिस्थिती नसताना केंद्र सरकारने तीन कृषी कायदे देशावर लादले आहेत, असं म्हणत त्यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मी कुण्या व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या विरोधात हे बोलतोय असं नाही. पण एखाद्या सरकारचं धोरण चुकत असेल तर त्याविरोधात मात्र मला हे तळमळीनं बोलावं लागतंय. आवाज उठवणं हे एक भारतीय म्हणून मी माझं कर्तव्य समजतो, असं रोहित पवार त्यांच्या फेसबुक पोस्टमधून म्हणाले आहेत. त्याच सोबत त्यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

पाहा पोस्ट –

थोडक्यात बातम्या-

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

गच्चीत उभा असताना त्याचा तोल गेला, अन्…, पाहा व्हिडीओ

झोमॅटो वाद प्रकरणात आला मोठा ट्विस्ट; डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणारी महिला फरार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता ‘या’ व्यक्तीची ATS कडून चौकशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More