पुणे | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या आणखी एका नातवाचा हट्ट पूर्ण केला आहे. रोहित पवार यांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे.
रोहित पवार कर्जत जामखेडमधून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यांनी यासंदर्भात काम देखील सुरु केलं होतं. अखेर राष्ट्रवादीच्या यादीत नाव आल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्यासाठी कर्जत जामखेडची लढाई सोपी नाही. कारण त्यांना आव्हान असणार आहे भाजपचे मंत्री राम शिंदे यांचं…
कर्जत-जामखेडमध्ये भाजपची मोठी वोटबँक आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग याठिकाणी आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्याप्रमाणे पराभव वाट्याला येऊ नये यासाठी रोहित पवार यांना प्रयत्न करावे लागतील.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, या ७७ जणांना दिली संधी- https://t.co/3kAolZQTrk #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
राणा पाटलांना उमेदवारी मिळाल्याने सहकारमंत्र्यांचा मुलगा नाराज; घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा https://t.co/a1pkg7fVGV @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
उदयनराजेंना रडण्यासाठी ऑस्कर नाही तर महाऑस्कर मिळायला हवा- रामराजे निंबाळकर https://t.co/7BOfZWdq7q @Chh_Udayanraje @BJP4India
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.