Top News

‘या’ व्यक्तीसोबत रोहित पवारांना लाँग ड्राईव्हला जायला आवडेल!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू सध्या तरूणाईमध्ये फार लोकप्रिय आहेत. अनेकजण त्यांच्या राजकीय कार्यासह वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतात.

नुकतंच रोहित पवार यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल एक गोष्ट सांगितली आहे. एका मुलाखतीदरम्यान रोहित पवार यांना लाँग ड्राईव्हला कोणासोबत जायला आवडतं असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी पत्नी कुंतीसोबत जायला आवडेल असं उत्तर दिलं.

रोहित पवार म्हणाले, “मला गाड्यांची आवड असून भावंडांसोबत तसंच काही मित्रांसोबत फिरायला जाण्यास आवडतं. पण लाँग ड्राइव्हसाठी मला पत्नी कुंतीसोबत जायला आवडतं.”

दरम्यान, मला मुलांसोबत कार्टून पहायला देखील फार आवडतं. कारण यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो आणि माझ्याही लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर येतात, असंही पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान नव्हे; मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या